चुंगडेंसह तिन्ही आरोपी कारागृहात

By Admin | Updated: November 21, 2015 01:54 IST2015-11-21T01:54:45+5:302015-11-21T01:54:45+5:30

किशोर खत्री हत्याकांड प्रकरण, ‘जस्सी’चा शोध लागेना.

Chungteen along with three accused in jail | चुंगडेंसह तिन्ही आरोपी कारागृहात

चुंगडेंसह तिन्ही आरोपी कारागृहात

अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणातील तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, तिन्ही आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. या हत्याकांड प्रकरणातील चौथा आरोपी ह्यजस्सीह्णचा पोलिसांना शोध लागत नसल्याचे समोर आले. बालाजी मॉलच्या आर्थिक वादातून किशोर खत्री यांची सोमठाणा शेतशिवारात ३ नोव्हेंबरच्या सायंकाळी हत्या करण्यात आली होती. या हत्येचा संशय किशोर खत्री यांचे बंधू दिलीप खत्री यांना रणजितसिंह चुंगडे यांच्यावर असल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून चुंगडे व त्यांचे साथीदार राजुसिंह मेहेर व अंकुश चंदेल या तिघांना अटक केली. या तीनही आरोपींना न्यायालयाने २0 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता रणजितसिंह चुंगडे, राजुसिंह मेहेर व अंकुश चंदेल या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या हत्याकांडातील चौथा आरोपी अद्यापही पोलिसांच्या जाळय़ात येत नाही.

Web Title: Chungteen along with three accused in jail