चिमण्यांचा चिवचिवाट हरवला, पण लक्षात काेण घेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:17 IST2021-03-20T04:17:03+5:302021-03-20T04:17:03+5:30
बाॅक्स दाेन प्रकारच्या चिमण्या घर चिमणी व रानचिमणी (पितकंठी) असे महाराष्ट्रातील चिमण्यांचे दोन प्रकार आहेत. जगात चिमण्यांचे २८, भारतात ...

चिमण्यांचा चिवचिवाट हरवला, पण लक्षात काेण घेते
बाॅक्स
दाेन प्रकारच्या चिमण्या
घर चिमणी व रानचिमणी (पितकंठी) असे महाराष्ट्रातील चिमण्यांचे दोन प्रकार आहेत. जगात चिमण्यांचे २८, भारतात सहा प्रकार असून, जगात चिमणीसदृश ४३ पक्षी आढळतात. ही चिमणी चिमणी शिळेपाके अन्न, धान्य, कोळी, कीटक, नाकतोडे असे अन्न खाते. तसेच ती वर्षातून चार वेळा अंडी देते.
नागरिकांनाे हे करा
चिमणी वाचविण्यासाठी घराजवळ, गच्चीवर धान्य, पाणी ठेवणे, अडगळीची जागा निर्माण करणे, खोपे तयार करून ठेवणे (पाइपचा वापर करून), कीटकनाशकांचा प्रमाणात वापर करणे. शिकार न करणे, यामुळे चिमण्यांची संख्या वाढून पुन्हा त्यांचा चिवचिवाट ऐकून आजची मुले आणखी निसर्गाजवळ जातील, त्यांचा ताण नक्कीच कमी होईल, असा विश्वासही प्रा. करपे यांनी व्यक्त केला.
काेट
सिमेंटचे ताव बंद घरे झाल्याचे त्यांना घरट्या साठी जागा राहिली नाही रस्त्यावरची माती जाऊन त्याची जागा डांबरी व सिमेंट व डांबरीकरण घेतली आहे. आजूबाजूच्या उरलेल्या जागेवर पेवर आलेत, त्यामुळे त्यांना पंख किंवा त्वचेवरील धूळ, तेलकटपणा व परजिवीपासून सुटका करून घेण्यासाठी धूळ स्नान करायला मातीच राहिली नाही तसेच परस बागा नाहीसे झाल्या मुळे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मजबुरीने पाइपच्या छिद्रात किंवा जुन्या घराच्या छपरातील जागा मिळेल तिथे गवताच्या काड्या, कचऱ्यानी घरटे तयार करण्याची घडपड आपण पाहत आहाेत.
रवींद्र तेलकर पक्षिमित्र