चिमुकलीची हत्या; बापास कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:53 IST2017-09-18T01:52:36+5:302017-09-18T01:53:07+5:30

नायगाव परिसरातील रहिवासी असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या करणार्‍या तिच्या बापास पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शेख फिरोज शेख रशीद असे आरोपी बापाचे नाव आहे. 

Chimukuli murder; Baad kahdi | चिमुकलीची हत्या; बापास कोठडी

चिमुकलीची हत्या; बापास कोठडी

ठळक मुद्देचिमुकलीची निर्घृण हत्या करणार्‍या तिच्या बापास पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले यालयाने आरोपीस २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नायगाव परिसरातील रहिवासी असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या करणार्‍या तिच्या बापास पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शेख फिरोज शेख रशीद असे आरोपी बापाचे नाव आहे. 
नायगाव येथील संजय नगरातील रहिवासी शेख फिरोज शेख रशीद याची पाच वर्षीय चिमुकली आलिया परवीन ही शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घराबाहेर गेली असता ती बेपत्ता झाली होती. ती घरी परत न आल्याने तिच्या आईने वडील शेख फिरोज याला भ्रमणध्वनीवर माहिती दिली. 
त्यानंतर आई-वडिलांनी आलियाचा शोध सुरू केला; मात्र रात्री उशिरापर्यंत ती मिळाली नाही. तीन दिवसांनंतर आलिया परवीन हिचा मृतदेह नायगाव कचरा डेपोत एका पोत्यात बांधलेला नग्नावस्थेत आढळला होता. अत्यंत क्लिष्ट असलेल्या या प्रकरणात आलिया परवीनचा बाप शेख फिरोज शेख रशीद यानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापास रविवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी माधुरी नन्नावरे यांच्या न्यायालयासमोर आरोपीस हजर केले. न्यायालयाने आरोपीस २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: Chimukuli murder; Baad kahdi