गळफास घेउन मुलाची आत्महत्या

By Admin | Updated: August 27, 2015 00:55 IST2015-08-27T00:55:07+5:302015-08-27T00:55:07+5:30

न्यू तापडियानगर परिसरातील एका शेतामध्ये १४ वर्षीय मुलाने झाडाला गळफास घेतला.

Child's Suicide By Torture | गळफास घेउन मुलाची आत्महत्या

गळफास घेउन मुलाची आत्महत्या

अकोला - न्यू तापडियानगर परिसरातील एका शेतामध्ये १४ वर्षीय मुलाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, सदर मुलाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. न्यू तापडियानगर परिसरात संजय घाटोळ यांचे शेत असून, त्यांच्या शेतातील एका झाडाला मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सिव्हिल लाइन्स पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मुलाचा मृतदेह झाडावून खाली काढला. घटनास्थळ पंचनामा करून मुलाची ओळख पटविण्यासाठी आटापिटा सुरू केला. मात्र सदर मुलाची ओळख पटली नाही. गळफास घेतलेला मुलगा विवेकानंद कॉन्व्हेंटचा असल्याची माहिती बुधवारी दुपारनंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शाळेतील काही शिक्षिका व विद्यार्थ्यांना बोलावून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला; मात्र हा मुलगा विवेकानंद कॉन्व्हेंटचा नसल्याचे शिक्षकांनी स्पष्ट केल्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या मुलाची ओळख पटविण्याचे काम पुन्हा सुरू केले आहे.

Web Title: Child's Suicide By Torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.