घराच्या स्लॅबवरून पडल्याने मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 01:03 IST2017-05-29T01:03:20+5:302017-05-29T01:03:20+5:30
नेर धा. (जि. अकोला) : तेल्हारा तालुक्यातील नेर (धा.) येथे गजानन डिगांबर मोहोड यांचा मुलगा आकाश हा २८ मे रोजी सकाळी छतावर पाणी देण्यासाठी गेला असताना अचानक स्लॅबवरून पाय घसरून खाली पडला.

घराच्या स्लॅबवरून पडल्याने मुलाचा मृत्यू
नेर धा. (जि. अकोला) : तेल्हारा तालुक्यातील नेर (धा.) येथे गजानन डिगांबर मोहोड यांचा मुलगा आकाश हा २८ मे रोजी सकाळी ६ वाजता उठून नवीन बांधलेल्या घराच्या छतावर पाणी देण्यासाठी गेला असताना अचानक स्लॅबवरून पाय घसरून खाली पडला. आकाशला बेशुद्ध अवस्थेत अकोला येथे दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केला; मात्र आकाशने अकोलानजीकच आपला प्राण सोडला.आकाशने इयत्ता बारावीची परीक्षा दिली असून, तो इयत्ता पाचवीपासून तेल्हारा येथील सेठ बन्सीधर विद्यालयात शिकत होता. त्याच्या निधनाने संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली असून, संपूर्ण गावात अन्न शिजले नाही. आकाशच्या पार्थिवावर रविवारी दुपारी १२ वाजता नेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.