चित्रकला स्पर्धेला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: June 6, 2016 02:41 IST2016-06-06T02:41:04+5:302016-06-06T02:41:04+5:30
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘लोकमत’चा उपक्रम.

चित्रकला स्पर्धेला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अकोला: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवार, ५ जून रोजी सकाळी ८ वाजता नेहरू पार्कमध्ये चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. 'लोकमत'च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत शेकडो शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी दिलीप तायडे, माहिती अधिकारी गोविंद पांडे, लोकमत अकोला आवृत्तीचे सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, लोकमत समाचारचे अरुणकुमार सिन्हा, एचआर प्रमुख रवींद्र येवतकर, कला शिक्षक श्रीकांत चौथे व नेहरू पार्कचे संचालक बी.एस. देशमुख हे उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख अतिथींच्या हस्ते श्रद्धेय बाबूजी उपाख्य जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी व्यासपीठावर ठेवलेल्या फलकावर गणपती बाप्पांचे चित्र साकारून चित्रकला स्पर्धेचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले.
प्रास्ताविक लोकमत समाचारचे अरुणकुमार सिन्हा यांनी केले. सामाजिक वनीकरण विभागाचे माहिती अधिकारी गोविंद पांडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना जागतिक पर्यावरण का व केव्हापासून साजरा करण्यास सुरूवात झाली यासंदर्भात विशेष माहिती दिली. उद्घाटन कार्यक्रमानंतर लोकमतच्यावतीने विद्यार्थ्यांना ड्रॉइंग शीट वितरित करण्यात आल्या.