बालविवाह संपन्न, पोलीस अनभिज्ञ
By Admin | Updated: April 25, 2016 01:52 IST2016-04-25T01:52:12+5:302016-04-25T01:52:12+5:30
मेंढपाळांमध्ये आजही बालविवाहाची प्रथा कायम.

बालविवाह संपन्न, पोलीस अनभिज्ञ
तेल्हारा (अकोला): मेंढपाळांमध्ये आजही बालविवाहाची प्रथा कायम असून, तेल्हारा तालुक्यातील बेलखेड शेतशिवारात इच्छापूर (मध्यप्रदेश) येथील मुलगा आणि धुळे जिल्ह्यातील मुलीचा बालविवाह २४ एप्रिल रोजी मोठय़ा थाटात संपन्न झाला.
कायद्याने बालविवाह गुन्हा असला, तरी मेंढपाळांमध्ये बालविवाहाची प्रथा कायम आहे. या समाजातील मान्यवरांशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले, समाजात बालविवाह होत असले, तरी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मुलीला सासरी पाठविण्याची प्रथा आहे. विवाह सोहळय़ासाठी येणार्या पाहुण्यांना वाजत-गाजत मंडपात नेऊन स्वागत करण्यात येते. बालविवाहाची माहिती मिळाली नाही. माहिती मिळाली असती तर कायदेशीर कारवाई करता आली असल्याची प्रतिक्रीया हिवरखेड येथील ठाणेदार सुधाकर देशमुख यांनी दिली.