एक लाख रुपयांसाठी मुलाचे अपहरण
By Admin | Updated: February 6, 2015 02:12 IST2015-02-06T02:12:19+5:302015-02-06T02:12:19+5:30
अकोल्यातील घटना; गुन्हा दाखल.

एक लाख रुपयांसाठी मुलाचे अपहरण
अकोला: एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी १७ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची घटना गुरुवारी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी हबीबनगरातील अब्दुल रफिक अब्दुल रऊफ याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अब्दुल रफिकच्या कुटुंबावर दबाव आणल्याने त्याने सायंकाळी खैर मोहम्मद प्लॉटमधून मुलाची सुटका केली. रमाबाई आंबेडकरनगरातील मंगला सुरेश रायबोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास आरोपी अब्दुल रफिकने त्यांच्या घरी येऊन मुलगा मंगेश याला आवाज दिला. मंगेश बाहेर आल्यानंतर रफिकने त्याला चाकूचा धाक दाखविला आणि एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मंगला रायबोले यांच्या तक्रारीनुसार, डाबकी रोड पोलिसांनी आरोपी अब्दुल रफिक याच्याविरुद्ध भादंवि कलम ३६४ (अ), ३८७, ३८८ नुसार गुन्हा दाखल केला.