कूलरचा शॉक लागल्याने मुलाचा मृत्यू; अकोली रूपराव येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:30 IST2020-04-25T17:28:58+5:302020-04-25T17:30:37+5:30
अजय लक्ष्मण इंगळे (११) हा २४ एप्रिल रोजी रात्री कूलर लावण्यास गेला असता त्याला जबर शॉक लागला.

कूलरचा शॉक लागल्याने मुलाचा मृत्यू; अकोली रूपराव येथील घटना
तेल्हारा : कूलरचा शॉक लागून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना अकोली रूपराव येथे २४ एप्रिल रोजी घडली. अजय लक्ष्मण इंगळे असे मृतक मुलाचे नाव आहे.
अकोली रूपराव येथील इयत्ता पाचव्या वर्गात शिकणाऱ्या अजय लक्ष्मण इंगळे (११) हा २४ एप्रिल रोजी रात्री कूलर लावण्यास गेला असता त्याला जबर शॉक लागला. यावेळी कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच तत्काळ त्याला ग्रामीण रुग्णालय, तेल्हारा येथे नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतक अजय याला एक बहीण असून, आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या प्रकरणी पुढील तपास हिवरखेड पोलीस करणार आहेत.
तालुक्यातील दुसरी घटना
गेल्या आठ दिवसात तेल्हारा तालुक्यात शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मृतक हे अल्पवयीन होते. नागरिकांनी आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे व्यवस्थित हाताळून घरातील वायरिंग व्यवस्थित आहे की नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे.
फोटो आहे