मुख्यमंत्र्यांचा दौरा; शेतकरी जागर मंचचे पदाधिकारी स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 14:53 IST2019-11-03T14:53:11+5:302019-11-03T14:53:16+5:30
मनोज तायडे व कृष्णा अंधारे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.

मुख्यमंत्र्यांचा दौरा; शेतकरी जागर मंचचे पदाधिकारी स्थानबद्ध
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अकोला जिल्ह्याला भेट देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांचे आगमण होण्यापूर्वी शेतकरी जागर मंचाचे पदाधिकारी मनोज तायडे व कृष्णा अंधारे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.
मुख्यमंत्री येणार असल्याने खबदारीचा उपाय म्हणून दोन्ही नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी शिवसेना नेते दिवाकर रावते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता शेतकरी जागर मंचच्या नेत्यांनी त्यांना घेराव घालून शेतकऱ्यांच्या मनात खदखदत असलेला असंतोष व्यक्त केला. या पृष्ठभूमीवर खबरदारी म्हणून रविवारी सकाळीच मनोज तायडे यांना रामदास पेठ पोलिस ठाण्यात, तर कृष्णा अंधारे यांना सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले.