कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला बाजाेरियांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:19 IST2021-05-09T04:19:42+5:302021-05-09T04:19:42+5:30
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी टास्कफोर्स तयार केला आहे. मुख्यमंत्री स्वत: या टास्कफोर्सच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या ...

कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला बाजाेरियांकडून आढावा
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी टास्कफोर्स तयार केला आहे. मुख्यमंत्री स्वत: या टास्कफोर्सच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शनिवारी दुपारी त्यांनी आ. गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडून अकोल्यातील सर्व माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्री व टास्कफोर्सचे अधिकारी लवकरच एकूणच परिस्थितीसंदर्भात अकोल्यातील आरोग्य यंत्रणेसोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार सायंकाळी आ. बाजोरिया यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला आ. बाजोरिया यांच्यासह आ. विप्लव बाजोरिया, पल्लवी बाजोरिया, दीप बाजोरिया, यश बाजोरिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता श्रीमती मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, आयएमएचे अध्यक्ष डॉ. महेंद्र काळे, डॉ. भारती राठी, सौ. आरती टाकळकर, डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. अंभोरे, डॉ. चिराणिया, डॉ. राम शिंदे, डॉ. एस. एम. अग्रवाल, डॉ. शिरसाम, डॉ. दीपक केळकर, डॉ. अमोल केळकर, डॉ. मेहुल व्होरा, डॉ. शिरीष डेहणकर, डॉ. आर. बी. हेडा, डॉ. गडपाल, डॉ. काकड, डॉ. फिरोज खान यांच्यासह आयएमएचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो: मेल फोटोत
निधी कमी पडू देणार नाही!
सध्या कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत असून तिसरी लाट येऊ घातली आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण आरोग्य यंत्रणेने समर्थपणे या महामारीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असले पाहिजे, असे आ. बाजोरिया म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही गोष्टीसाठी आपण निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली.
शिवसेनाप्रमुखांच्या नावाने खासगी कोविड सेंटर
आ. बाजोरिया यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेही दुसरे खासगी सेंटरही लवकरच जनतेच्या सेवेत रुजू होईल. या सर्व ठिकाणी खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याचे आवाहन याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी केले.