मुख्यमंत्री उद्या अकोल्यात
By Admin | Updated: February 4, 2015 01:47 IST2015-02-04T01:47:17+5:302015-02-04T01:47:17+5:30
पीडीकेव्ही दीक्षांत समारंभाला उपस्थिती.

मुख्यमंत्री उद्या अकोल्यात
अकोला- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस गुरुवार, ५ जानेवारी रोजी अकोल्यात येत आहेत. त्यांच्या दौरा निश्चित झाला असल्याची माहिती मंगळवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून अकोला जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. दीक्षांत समारंभ सकाळी १0 वाजता होणार असून, त्यापूर्वी विमानाने मुख्यमंत्री अकोला येथे येतील. या समारंभाला मुख्यमंत्र्यांसोबत कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचीही उपस्थिती राहील. केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत मात्र अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषिशास्त्र, उद्यानविद्या, वनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करणार्या ३३,३५६ विद्यार्थ्यांनी पदवी ग्रहण केली आहे. त्यामध्ये पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी २५,४१४, तर ७,४३४ पदव्युत्तर आणि ५0८ विद्यार्थ्यांना पीएचडी ही पदवी प्राप्त केली आहे. यावर्षी एकूण १,५७0 विद्यार्थ्यांनी हे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले. यातील १0५३ विद्यार्थ्यांना ५ फेब्रुवारी रोजी मुख्मंत्र्यांच्या उपस्थितीत पदवीदान केली जाईल.