बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ

By Admin | Updated: November 20, 2015 01:55 IST2015-11-20T01:55:29+5:302015-11-20T01:55:29+5:30

अकोला येथे अखिल भारतीय खुली रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा.

Chess Starters | बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ

बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ

अकोला: अकोला चेस असोसिएशनच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेस गुरुवारी महाराजा अग्रसेन भवन येथे प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन आमदार गोपीकिसन बाजोरिया यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र बुद्धिबळ स्पर्धेचे सचिव दिलीप पागे, जळगाव बुद्धिबळ संघटनेचे सचिव फारू ख शेख, समाजसेवी डॉ. एम.एम.राठी, असोसिएश्नच्या अध्यक्ष डॉ. भारती राठी, सचिव प्रवीण हेंड यांची प्रमुख उपस्थित होती. स्पर्धा स्विस लिग पद्धतीने खेळविण्यात येत आहेत. स्पर्धेचा समारोप शुक्रवार, २0 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Web Title: Chess Starters