पंचरंगी लढतीमुळे सटोडियांचा ‘केमिकल लोचा’

By Admin | Updated: October 3, 2014 02:02 IST2014-10-03T02:02:49+5:302014-10-03T02:02:49+5:30

अनेकांचे ‘वेट अँन्ड वॉच’: दसर्‍यानंतरच दर निश्‍चिती शक्य.

'Chemical loop' of 'Steadian' | पंचरंगी लढतीमुळे सटोडियांचा ‘केमिकल लोचा’

पंचरंगी लढतीमुळे सटोडियांचा ‘केमिकल लोचा’

अकोला : जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात पंचरंगी लढत होणार असल्याने सटोडियांचा केमिकल लोचा झाला आहे. त्यामुळे बहुतांश सटोडियांनी वेट अँन्ड वॉचचे धोरण अवलंबिले असून, विजयादशमीनंतर पहिला रेट निश्‍चित होण्याची शक्यता आहे.
कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युती तुटल्याने चारही पक्ष विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम, आकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूर मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी, कॉँग्रेस, भारिप-बमंसमध्ये बंडखोरीही झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकाही उमेदवाराच्या विजयाची खात्री दिल्या जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती गत दीड दशकांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये निर्माण झाली नव्हती. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत पक्ष आणि उमेदवारांचा पहिला रेट निश्‍चित करताना सटोडियांचाही केमिकल लोचा झाला आहे. काहींच्या मते विजयादशमीनंतर पक्षनिहाय किंवा उमेदवारनिहाय पहिला ह्यरेटह्ण निश्‍चित होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनी प्रत्यक्ष प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार असून, वातावरण निर्मिती झाल्यानंतर ह्यरेटह्ण कमी-जास्त होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: 'Chemical loop' of 'Steadian'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.