शेतक-यांचा चटणी-भाकर सत्याग्रह मोर्चा
By Admin | Updated: November 13, 2015 01:57 IST2015-11-13T01:57:52+5:302015-11-13T01:57:52+5:30
दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी भरले कुटाराचे पोते.

शेतक-यांचा चटणी-भाकर सत्याग्रह मोर्चा
मालेगाव (जि. वाशिम): येथे भर दीपावलीच्या काळात शेतकर्यांनी चटणी-भाकर खाऊन सत्याग्रह केला व दिवाळीची भेट म्हणून मुख्यमंत्री व मंत्री यांना कुटाराचे पोते भेट दिले आहे. मालेगाव येथे १२ नोव्हेंबरला जुन्या बसस्थानकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चटणी- भाकर खाऊन सत्याग्रह मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोधर इंगोले यांनी केले. सकाळी ११ वाजता जुन्या बसस्टँडवर शेकडो शेतकरी जमा झाले होते. मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकर्यांच्या मुलांची शिक्षणाची फी माफ करावी, सोयाबीनला ६000 रुपये हमीभाव देण्यात यावा, शेतकर्यांना नियमित वीज द्यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी कुटाराचे पोते भरण्यात आले. यावेळी शेतकरी नेते तथा जि.प. सदस्य गजानन अमदाबादकर, जिल्हाध्यक्ष दामोधर इंगोले, कार्याध्यक्ष सोहम झनक, राजू शिंदे, गजानन इढोळे, बंडू इंगोले, शरद कोरडे, गणेश अवचार, ङ्म्रीनाथ काळे आदी अनेक शेतकरी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.