सनदी लेखापालाच्या कार्यालयात तोडफोड!

By Admin | Updated: October 25, 2016 03:05 IST2016-10-25T03:05:18+5:302016-10-25T03:05:18+5:30

अज्ञात आरोपींनी केली तोडफोड; हार्ड डिस्क केली लंपास.

Charted Accountant's office collapsed! | सनदी लेखापालाच्या कार्यालयात तोडफोड!

सनदी लेखापालाच्या कार्यालयात तोडफोड!

अकोला, दि. २४- सिंधी कॅम्पमधील दक्षता नगर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका सनदी लेखापालाच्या कार्यालयात अज्ञात दोघांनी तोडफोड केल्याची घटना सोमवारी समोर आली. या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. दक्षता नगरमध्ये एका सनदी लेखापालाचे कार्यालय असून रविवारी रात्री या कार्यालयात दोघे अज्ञात व्यक्ती घुसले व त्यांनी दुकानातील संगणकाची तोडफोड केली. संगणकामधील एक हार्ड डिस्क या हल्लेखोरांनी लंपास केल्याची माहिती आहे. या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

Web Title: Charted Accountant's office collapsed!