वाडेगावात दाेन ठिकाणी चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:21 IST2021-01-16T04:21:27+5:302021-01-16T04:21:27+5:30

वाडेगाव स्टेट बॅंकेच्या बाजूला शिव ट्रेडींग व रवी पाटील सरप यांच्या दुकानात बुधवारी चोरी झाली. यामध्ये १५ हजार रुपये ...

Chari at the right place in Wadegaon | वाडेगावात दाेन ठिकाणी चाेरी

वाडेगावात दाेन ठिकाणी चाेरी

वाडेगाव स्टेट बॅंकेच्या बाजूला शिव ट्रेडींग व रवी पाटील सरप यांच्या दुकानात बुधवारी चोरी झाली. यामध्ये १५ हजार रुपये रोख तर ३० हजार रुपयांचे लॅपटॉप चोरट्यांनी पळवले. गावात यापूर्वी बुलडाणा अर्बन बँक, पूजा ट्रेडर्स, लखाडे ज्वलर्स, लक्ष्मी ज्वलर्स, प्रमोद किराणा व मेडिकलमध्ये चोऱ्या झाल्या होत्या. दोन दुकानदारांनी चोरी होऊनसुद्धा पाेलिसात तक्रार दिली नाही. अद्यापपर्यंत एकाही गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात आले नसून फक्त पोलीस तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. गावात पोलीस चौकी असूनही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चाेरट्यांनी आव्हान दिले आहे. पोलीस चौकीला नेहमीच कुलूप लावलेले असते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

Web Title: Chari at the right place in Wadegaon