आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:13 IST2021-02-05T06:13:29+5:302021-02-05T06:13:29+5:30

--------------------------------------- तुदगाव रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी तेल्हारा: नगर परिषद हद्दीतील तुदगाव रस्त्यावर गणेश सुभाष खारोडे यांच्या घरासमोर एकाने खोका ...

Charge the perpetrator to commit suicide | आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

---------------------------------------

तुदगाव रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

तेल्हारा: नगर परिषद हद्दीतील तुदगाव रस्त्यावर गणेश सुभाष खारोडे यांच्या घरासमोर एकाने खोका टाकून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे गणेश खारोडे यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी गणेश खारोडे यांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

----------------------------------------------

गणराज्यदिनी माझोडच्या वाघमारे यांनी आत्मदहनाचा इशारा

माझोड: येत्या २६ जानेवारी २०२१ रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा माझोड येथील राजीव श्रावण वाघमारे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

राजीव वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, तांदळी खुर्द येथील ग्रामीण गुरुकुल शिक्षण संस्थेनी मागासवर्गीयांचा अनुशेष डावलून बनावट ठराव व खोटे दस्ताऐवज तयार करून आरक्षण कायदा २००४ चा संगनमताने भंग केल्याचा आरोप केला आहे. अनियमितरित्या शासनावर आर्थिक भार निर्माण करून शासनाची व माझी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. अनेक तक्रारी देऊनही न्याय मिळाला नसल्याने येत्या २६ जानेवारी रोजी गणराज्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मदहन करणार असल्याचा इशारा राजीव वाघमारे यांनी निवेदनातून दिला आहे.

Web Title: Charge the perpetrator to commit suicide