प्रभारी आयुक्तांना पुन्हा अल्टिमेटम!

By Admin | Updated: November 13, 2014 01:19 IST2014-11-13T01:19:50+5:302014-11-13T01:19:50+5:30

मुलभूत सुविधा कोलमडल्या, अकोला महानगर पालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांचा कक्षात ठिय्या.

In-charge commissioners re-ultimatum! | प्रभारी आयुक्तांना पुन्हा अल्टिमेटम!

प्रभारी आयुक्तांना पुन्हा अल्टिमेटम!

अकोला : प्रशासनाच्या विसंगत भूमिकेमुळे शहरात मूलभूत सुविधा कोलमडल्या असून, विविध विभागांतील कंत्राटी अभियंत्यांनी काम बंद छेडण्याचे संकेत दिले आहेत. या सर्व मुद्यांवर तोडगा न काढता प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप करीत माजी सभापती विजय अग्रवाल यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपाचे प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर यांच्या कक्षात बुधवारी सायंकाळी ठिय्या दिला. गुरुवारी दुपारपर्यंत ठोस निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आयुक्तपदाचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे दिला असला तरी मनपाचा सर्व कारभार डॉ. कल्याणकर यांच्या निर्देशावरून सुरू असल्याची परिस्थिती आहे. कल्याणकर दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यानंतर प्रभारी आयुक्त दिवेकर यांना उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांची मोठी मदत होईल,अशी अपेक्षा होती. सद्य:स्थितीत मनपाची वाटचाल लक्षात घेता, प्रशासकीय कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे. पडीत प्रभागातील साफसफाईचे कंत्राट संपुष्टात आल्याने व देयक अदा करण्यास प्रशासनाने नकार दिल्याने कंत्राटदारांनी साफसफाईचे काम बंद केले. कचरा उचलणार्‍या क्षितिज संस्थेने काम बंद करण्याचा इशारा दिला असून, जलप्रदायची कामे ठप्प आहेत. पथदिवे देखभाल-दुरुस्ती करणार्‍या कंत्राटदाराने थकीत देयकामुळे काम करण्यास नकार दिला. शिवाय मानधन तत्त्वावरील २३ अभियंत्यांनीसुद्धा काम बंद करण्याचे संकेत दिले आहेत. नादुरुस्त जलवाहिन्यांमधून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे सांगत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आरोप करीत नगरसेवकांनी दिवेकर यांना धारेवर धरले.

Web Title: In-charge commissioners re-ultimatum!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.