शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल आवश्यक
By Admin | Updated: November 9, 2014 23:40 IST2014-11-09T23:40:53+5:302014-11-09T23:40:53+5:30
बुलडाणा येथे दिवंगत डॉ कुल्ली यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात अभिनेते अतुल कुलकर्णी यांचे प्रतिपादन.

शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल आवश्यक
बुलडाणा : भारतीय समाजव्यवस्थेची मानसिकता बदलवायची असेल, तर आधी शिक्षण व्यवस्थेत मूलभूत सुधारणांची गरज आहे. आजच्या शिक्षण पद्धतीतून केवळ स्वार्थी माणसे निर्माण केली जाऊ शकतात. स्वार्थी माणसे समाज विकासाचे कोणतेही काम करू शकत नाहीत, असे परखड मत सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
दिवंगत प्रा. डॉ. सदाशिव कुल्ली यांच्या १५व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे उद्घाटन शनिवारी अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. नरेंद्र लांजेवार आणि प्रा. विनोद देशमुख यांनी त्यांची प्रगट मुलाखत घेतली. ते म्हणाले की, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुधारणा या सर्व गोष्टींमध्ये मोठे काम करण्यास वाव आहे. करियरच्या नावाखाली आम्ही सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक आंधळी स्पर्धा राबवत आहोत. यातून मुठभर विद्यार्थी पुढे जातात; परंतु बाकीचे विद्यार्थी मागे पडतात. याऐवजी विद्यार्थ्यांमधील वेगवेगळया कलागुणांना वाव देवून त्यांना पुढे आणण्याचे काम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. स्त्रियांबद्दल समाजाच्या बुरसटलेल्या मानसिकतेचा त्यांनी समाचार घेतला.