विदर्भातील सिंचन क्षेत्राचे चित्र बदलवू

By Admin | Updated: October 3, 2014 00:34 IST2014-10-03T00:34:26+5:302014-10-03T00:34:26+5:30

देवेंद्र फडवणीस यांचे कारंजा येथील जाहीर सभेत प्रतिपादन.

Change the picture of irrigation area in Vidarbha | विदर्भातील सिंचन क्षेत्राचे चित्र बदलवू

विदर्भातील सिंचन क्षेत्राचे चित्र बदलवू

कारंजा लाड (वाशिम): विदर्भात आजमितीला केवळ ७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. सिंचन वाढीसाठी कोट्यवधी खर्च केले असताना सिंचन क्षेत्राची अवस्था राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यकुशलतेचा परिचय करून देण्यास पुरेशी आहे. हे चित्र बदलविण्याचा संकल्प घेऊन भाजपा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार २ ऑक्टोबर रोजी येथे केले.
जिल्हय़ातील तीनही मतदारसंघातील भाजप व महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारानिमित्त ते कारंजा येथे आले होते. स्थानिक मुलजी जेठा विद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभेत बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, जिल्हय़ात सोयाबीनवर प्रक्रिया करणारा उद्योग स्थापन करण्यासह जिल्हय़ाचा विकास करू असे सांगून त्यांनी आघाडी सरकारवर ताशोरे ओढले. या सभेला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे नरेंद्र गोलेच्छा, जिल्हाध्यक्ष सुरेश लुंगे, अँड. विजय जाधव, लखन मलिक , तेजराव वानखडे, संदीप गढवाले, निरंजन करडे, मीना काळे, नगराध्यक्ष नीशा गोलेच्छा, नीळकंठ पाटील, मंदा दहातोंडे, महादेव ठाकरे, जितेंद्र महाराज यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पाटणी यांनी, तर संचालन अतुल धाकतोड यांनी केले.

Web Title: Change the picture of irrigation area in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.