महानिर्मितीच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 14:48 IST2017-12-29T14:39:35+5:302017-12-29T14:48:46+5:30

पारस(जि.अकोला) : पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे पार पडलेल्या महानिर्मितीच्या राज्यस्तरीय आंतरगृह क्रीडा स्पर्धेत चंद्र्रपूर औष्णिक विद्युत केंद्राला सर्वसाधारण विजेतपद बहाल करण्यात आले.

Chandrapur team winner state-level sports competition of Mahagenco | महानिर्मितीच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद

महानिर्मितीच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद

ठळक मुद्देनवीकरणीय ऊर्जा (पुणे-नाशिक) संघ शिस्तबद्ध संघाचा मानकरीसमारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारस औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे होते. पारस येथील विद्युत नगर क्रीडांगणावर पार पडल्या स्पर्धा.

पारस(जि.अकोला) : पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे पार पडलेल्या महानिर्मितीच्या राज्यस्तरीय आंतरगृह क्रीडा स्पर्धेत चंद्र्रपूर औष्णिक विद्युत केंद्राला सर्वसाधारण विजेतपद बहाल करण्यात आले. महानिर्मितीच्या नाशिक येथील बाह्यगृह व पारस येथील आंतरगृह राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेच्या एकूण गुणतालिकेनुसार चंद्र्रपूर औष्णिक विद्युत केंद्राला सर्वसाधारण विजेतपद तर नवीकरणीय ऊर्जा (पुणे-नाशिक) संघ शिस्तबद्ध संघाचा मानकरी ठरला. विजेत्या खेळाडूना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारस औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे होते. तर मुख्य अतिथी म्हणून महानिर्मितीचे कार्यकारी संचालक राजू बुरडे उपस्थित होते. उप मुख्य अभियंता मनोहर मसराम, अधीक्षक अभियंते कन्हैयालाल माटे,रुपेंद्र गोरे, सुधाकर पाटील, श्रीराम बोदे आदी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. प्रारंभी चंद्रकांत थोटवे संचालक(संचलन) व इतर मान्यवरांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. तसेच यावर्षी सेवानिवृत्त होणाºया कर्मचारी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्यात एस.बी.घोडमारे,जी.आर.पांडे(कोराडी),के.एम.धानुका(खापरखेडा),डी.के.देशमुख(भुसावळ),एस.के.आमडेकर,बी.जी.पाटील,बी.व्ही.सहस्त्रबुद्धे(मुंबई),एस.एस.खैरनार(नाशिक),पी.डी.कोंडेकर(पारस) यांचा समावेश होता. तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचा धावता आढावा उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भालचंद्र गायकवाड यांनी घेतला. तर खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून चंद्र्रकांत सपकाळे, राजेश गोरले, सुधीर मुंडे यांनी मनोगतातून सर्वांगसुंदर आयोजनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. कार्यक्रमाचे संचालन राम गलगलीकर व आदिती धाराशिवकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रभारी कल्याण अधिकारी संदीप पळसपगार यांनी केले.
याप्रसंगी, संघ व्यवस्थापक,सर्व संघांचे खेळाडू, वीज केंद्रांचे कल्याण अधिकारी सुधाकर वासुदेव, प्रसाद निकम, पंकज सनेर,आनंद वाघमारे, अमरजित गोडबोले, दिलीप वंजारी, कोपटे मॅडम, पारस वीज केंद्राचे अधिकारी, विभाग प्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ, संघटना प्रतिनिधी, विद्युत नगर वसाहतीतील नागरिक, क्रीडास्पर्धा आयोजन समिती पदाधिकारी/सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

संधीचे सोने केल्यास मोठे यश लाभते ...राजू बुरडे
यशस्वी खेळाडूंनी यापुढे अधिक नैपुण्यतेकडे भर द्यावा तर अपयश आलेल्या खेळाडूंनी हि नवीन संधी समजून अधिक परिश्रम करावे,जेणेकरून आगामी काळात मोठे यश पदरी पडेल असे मत महानिर्मितीचे कार्यकारी संचालक राजू बुरडे यांनी व्यक्त केले. अखंडित वीज उत्पादनातील खडतर कामाचा भाग लक्षात घेतल्यास क्रीडास्पर्धा, नाट्यस्पर्धा याद्वारे नवीन ऊर्जा मिळते व सुप्तगुणांच्या विकासासोबतच सांघिक भावना दृढ होण्यास हातभार लागतो. एकूणच, वीज उत्पादनाच्या प्रक्रियेवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो, असेही बुरडे म्हणाले.

 

Web Title: Chandrapur team winner state-level sports competition of Mahagenco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.