येत्या चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता!
By Admin | Updated: May 30, 2017 02:32 IST2017-05-30T02:32:42+5:302017-05-30T02:32:42+5:30
आज विदर्भात सोसाट्याचा वारा; मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

येत्या चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून, येत्या चार दिवस राज्यात काही भागात तुरळक पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली. ३० मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. मागील चोवीस तासात राज्यात चंद्रपूर येथे ४५. से. सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. सध्या मध्य-पूर्व बंगालचा उपसागरावर असलेल्या कमी (न्यून) दाबाच्या क्षेत्राचे रू पांतर ‘मोरा’ चक्रीवादळात झाले आहे. मागील चोवीस तासात कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. तसेच कोकण-गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, ३० मे रोजी कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३१ मे रोजी दक्षिण कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. १ जून रोजी कोकण, गोवा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. ३० मे रोजी विदर्भात सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आहे.