एसओएस बेसबॉल संघाला विजेतेपद
By Admin | Updated: September 19, 2014 00:12 IST2014-09-19T00:12:12+5:302014-09-19T00:12:12+5:30
अकोला जिल्हा स्तर शालेय बेसबॉल स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या संघाने विजेतेपद पटकाविले.

एसओएस बेसबॉल संघाला विजेतेपद
अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने वसंत देसाई क्रीडांगण येथे आयोजित जिल्हा स्तर शालेय बेसबॉल स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्स ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षाआतील गटात मुले व मुली दोन्ही संघाने विजेतेपद पटकाविले. बुलडाणा येथे होणार्या विभागीय स्तर स्पर्धेत दोन्ही संघ अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मुलींच्या संघात राधिका देशमुख, शरयू राऊत, यशा गडोदिया, साक्षी महल्ले, सायली मांडेकर, अंकिता करे, विधी बैस, राधा मुरूमकार, मृण्मयी बोबडे, वसुधा देशमुख, पायल चितलागीया, सृष्टी देशमुख, शिवानी पवार, मयूरी मोहोड, ऐश्वर्या चौधरी तर मुलांच्या संघात वैभव अहिर, वैभव कोल्हे, आशुतोष कासट, राहुल गवारगुरू, विवेक पाठक, नारायण वानखडे, अभिषेक खंडेलवाल, हिमांशु जयस्वाल, तेजस वाघरे, मयूर साधवाणी, हर्ष कनसागर, गौरव गुरुखुद्दे, श्रीपाद सुजदेकर, आकाश हरसुले, तन्मय खंडारे यांचा समावेश आहे. तसेच १९ वर्षाआतील मुलींच्या सॉफ्टबॉल संघाने विजेतेपद पटकाविले. विजयी संघाला क्रीडा विभागप्रमुख राजेंद्र डोंगरे, क्रीडा शिक्षक रामेश्वर राठोड, विजय महल्ले, सुशील लंकेश्वर, ऋतुजा वानखडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य सुरेश लकडे, उपमुख्याध्यापिका मुक्ता पिल्ले, प्रशासकीय अधिकारी राजेश कड यांनी कौतुक केले.