चाकण कार्यालय वर्धापनदिन साधेपणाने

By Admin | Updated: August 30, 2014 01:11 IST2014-08-30T01:11:38+5:302014-08-30T01:11:38+5:30

उत्तर पुणे जिल्ह्यातील माळीण गावात नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेचे सामाजिक भान ठेवून या वर्षी ‘लोकमत’ चाकण कार्यालयाचा तिसरा वर्धापनदिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला

Chakan Office Anniversary | चाकण कार्यालय वर्धापनदिन साधेपणाने

चाकण कार्यालय वर्धापनदिन साधेपणाने

अकोला : अनिकट भागातील नितेश रमेश मिश्रा याच्या घरात सुरू असलेल्या जुगारावर शुक्रवारी अँन्टी गुंडा स्क्वॉड व कोतवाली पोलिसांनी संयुक्त छापा घालून १२ आरोपींना गजाआड केले. पोलिसांनी आरोपींकडून ६८ हजार ८२0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी रवी मिश्रीलाल साहू (३५ रा. गीतानगर), विनोद केशवराव बडवे (३५ रा. अनंतनगर), संतोष गायकवाड (२८ रा. अनंतनगर), नितेश रमेश मिश्रा (२८ रा. अनिकट), रमण विनोद गड्डम (२८ रा. कमला नेहरू नगर), राजू श्रीधर सांगळे (४७ रा. अनिकट), मदन तुळशीराम मेश्राम (४३ रा. अनिकट), सतीश रमेश मिश्रा (३८ अनिकट), संदीप विनायक हिरूळकर (३0 रा. कमला नेहरू नगर), राजू नारायण श्रीनाथ (४0 रा. जुने शहर), संजय नारायण रत्नपारखी (४२ रा. अनिकट), किरण रामसिंह बघेल (३५ रा. अनिकट) यांना अटक केली. आरोपींकडून रोख ५0 हजार ८२0 रुपये व १८ हजार रुपयांचे १0 मोबाईल जप्त केले.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिरूद्ध आढाव, एसआय चंद्रकांत ठोंबरे, एएसआय शेख हाशम, महेंद्र बहादूरकर, सुरज चिंचोळकर, संजय वानखडे, विलास बंकावार, असद खान, खुशाल नेमाडे, शक्ती कांबळे, अमोल बहादूरकर, नीलेश पाचपवार यांच्या पथकाने केली.
* तीन वर्षांतील छाप्यांपैकी सर्वात मोठी रोख
पोलिसांकडून अधूनमधून वरली, जुगार अड्डय़ावर छापे घातले जातात. छापा घालताना अड्डा चालविणार्‍या मालकाला जाणीवपूर्वक फरार केले जाते आणि अड्डय़ातील तीन ते चार लोकांना पकडून त्यांच्याकडून तुंटपुंजी रक्कम जप्त केल्या जाते. पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या कार्यकाळात अनेक जुगार अड्डय़ावर छापे घातले; परंतु छाप्यामध्ये जप्त केलेली रोख किंवा मुद्देमाल कधीच २५ हजाराच्यावर गेला नाही. अनिकट येथील छाप्यामधून पहिल्यांदा ५0 हजारांची रोख रक्कम जप्त केली. दोन-तीन वर्षांंतील छाप्यांपैकी सर्वात मोठी रोख आहे, हे विशेष.

Web Title: Chakan Office Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.