क्षुल्लक कारणावरून चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2017 09:23 IST2017-07-09T09:23:32+5:302017-07-09T09:23:32+5:30

मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ कारणावरून एकावर चाकूहल्ला केल्याची घटना शनिवारी घडली.

Chakahala from a trivial cause | क्षुल्लक कारणावरून चाकूहल्ला

क्षुल्लक कारणावरून चाकूहल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ कारणावरून एकावर चाकूहल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सूरज देवीदास तायडे (वय २१) हा त्याचे मित्र राजूबाबा ऊर्फ राज आत्माराम घुगे व रोशन जामनिक यांच्यासह त्रिमूर्ती चौकात शुक्रवारी रात्री १0.३0 वाजता उभे होते. यावेळी राज घुगे व रोशन जामनिक यांनी गोलू गवई याला बोलावून आणले. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला.
यावेळी गोलूचे आईचे आई-वडील यांनी राज घुगे याला मारहाण केली. तर गोलू याने घरातील चाकूने राज घुगे याच्या डोक्यावर व हातावर वार केले. त्यात राज घुगे जखमी झाला. या प्रकरणी राजू सावळे याने सिव्हिल लाइन्स पोलिसात तक्रार दिली, यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Chakahala from a trivial cause