संक्रांतीनिमित्त बाजारपेठेत चैतन्य
By Admin | Updated: January 15, 2015 00:32 IST2015-01-15T00:32:54+5:302015-01-15T00:32:54+5:30
संक्रांतीनिमित्त अकोल्याची बाजारपेठ फुलली.

संक्रांतीनिमित्त बाजारपेठेत चैतन्य
अकोला : संक्रांतीनिमित्त अकोल्याची बाजारपेठ फुलली असून, संक्रांतीला वाण देण्यासाठी लागणार्या विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिला वर्गाने केलेल्या गर्दीमुळे बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. प्रमुख बाजारपेठेसह शहरात इतर ठिकाणीदेखील वाणाचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. वाणात देण्यासाठी विविध प्रकारच्या प्लास्टिकच्या तसेच स्टिलच्या लहान-मोठय़ा वस्तूंसह श्रुंगारासाठी लागणार्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. वाणाचे साहित्य खरेदी करताना बोरं, पेरू, ऊस, हरभरा, बिब्याची फुले, मटरच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगांना मोठय़ा प्रमाणात मागणी होती.