सभापती, उपसभापतीची निवडणूक २ सप्टेंबरला

By Admin | Updated: August 25, 2014 03:13 IST2014-08-25T03:12:05+5:302014-08-25T03:13:56+5:30

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक

Chairperson, Vice Presidential election will be held on September 2 | सभापती, उपसभापतीची निवडणूक २ सप्टेंबरला

सभापती, उपसभापतीची निवडणूक २ सप्टेंबरला

तेल्हारा - कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हाराच्या रिक्त झालेल्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक २ सप्टेंबरला बाजार समितीच्या सभागृहात होणार आहे.
तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी पॅनल, भाजप, भारिप-बमसं या संयुक्त आघाडीने विजय संपादन केल्यानंतर अडीच वर्षाच्यावर कालावधी झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे संदीप खारोडे यांनी सभापती पदाचा व रामकृष्ण नागोलकार यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिला. शेतकरी पॅनलचे नेते अण्णासाहेब बिहाडे, भारिप-बमसंचे नेते प्रदीप वानखडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजाभाऊ राजनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त आघाडीतील सर्व संचालकाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर सभापती, उपसभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाची निवडणूक २ सप्टेंबरला बाजार समितीत बोलावण्यात आलेल्या विशेष सभेत होणार आहे.
शेतकरी पॅनल, भाजप, भारिप-बमसं या तिघांमध्ये ठरल्याप्रमाणे उर्वरित कालावधीकरिता सभापतीपद भारिप-बमसं व उपसभापतीपद भाजपकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये सभापती व उपसभापती पदी कुणाची वर्णी लागते; याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Web Title: Chairperson, Vice Presidential election will be held on September 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.