शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेने केली २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 15:50 IST

मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यानच्या १५० दिवसांत ऊर्जा, उद्योग व कृषी क्षेत्राची गरज पूर्ण करीत, २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे.

अकोला : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली, तरी या काळात ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वस्तू व माल वेळेवर पोहोचविण्यासाठी मालगाड्या सुरू आहेत. मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यानच्या १५० दिवसांत ऊर्जा, उद्योग व कृषी क्षेत्राची गरज पूर्ण करीत, २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे.देशांतर्गत मालवाहतुकीसाठी रेल्वेचा सर्वाधिक वापर होतो. अवजड उद्योग, कृषीपूरक साहित्य, ऊर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रातील मालवाहतुकीसाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय आहे. देशभरात लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरितांना ने-आण करण्यासाठी काही गाड्या वगळता रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा बंदच आहे. या काळात रेल्वेने मालवाहतूक मात्र पूर्ण क्षमतेने चालू ठेवली. लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून २३ मार्च २०२० ते अनलॉक-३ च्या १९ आॅगस्ट २०२० या १५० दिवसांच्या कालावधीत मध्य रेल्वेने ८,०२५ मालगाड्यांमधून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड आणि स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची वाहतूक केली. या कालावधीत दररोज सरासरी २,५५८ वाघिणी मालाची वाहतूक केली. वाघिणी भारांच्या बाबतीत ३,८३,१८९ वाघिणींमध्ये २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली.अशी केली वाहतूकमध्य रेल्वेने अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी १,४५,३१५ कोळशाच्या वाघिणींचा पुरवठा विविध ऊर्जा प्रकल्पांना केला. तसेच ४,२४८ वाघिणींमधून अन्नधान्य आणि साखर; शेतकऱ्यांच्या हितासाठी १७,५३६ वाघिणी खते आणि ५,३०५ कांदा; पेट्रोलियम पदार्थांच्या ३७,८४० वाघिणी, लोह आणि स्टीलच्या ९,९०९ वाघिणी, सिमेंटच्या २५,११२ वाघिणी, १,१८,८२६ कंटेनर वाघिणी आणि सुमारे १९,०९८ वाघिणी डी-आॅइल केक व इतर वस्तूंची वाहतूक केली.

 

टॅग्स :railwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेAkolaअकोला