शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अर्ध्यावरतीच मोडला जल्लोषाचा डाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:24 IST

साडेसातनंतरच्या पंधरा मिनिटात साºया तयारीचा डाव अर्ध्यावरतीच मोडावा लागला.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राजकारण हा गृहितांचा खेळ नाही, कधीही काहीही होऊ शकते या उक्तीचा प्रत्यय सोमवारी अकोल्यातील शिवसैनिकांसह राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आला आहे. राज्यात महाशिवआघाडी अस्तित्वात आली आहे, शिवसेना नेते सत्तेचा दावा करण्यासाठी राज्यपालांच्या निवासस्थानी पोहोचले हे माध्यमांमधून समोर आल्यावर अकोल्यात शिवसेना व राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली होती. प्रसार माध्यमांना याबाबत कळविण्यातही आले, सोशल मीडियावरही आमंत्रणे झळकली अन् राज्यपालांनी सेनेला मुदतवाढ देण्यास नकार दिल्याचे समोर आले. या प्रकारामुळे साडेसातनंतरच्या पंधरा मिनिटात साºया तयारीचा डाव अर्ध्यावरतीच मोडावा लागला.शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेस अशा पक्षांनी एकत्र येत महाशिवआघाडीचे अस्तित्व तयार झाल्याची चर्चा दिवसभर होती. संध्याकाळी या चर्चेने जोर पकडला, मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच अकोल्यातील पदाधिकाºयाचे डोळे व कान मुंबईकडे लागून होते. अखेर शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदारांसह आदित्य ठाकरे हे राजभवनाकडे निघाल्यावर जिल्हाभरात जल्लोष सुरू झाला. सोशल मीडिीयावर अनेक मेसेजच झळकू लागले, भाजपाची खिल्ली उडविणारे, सेनेला वरचढ दाखविणारे अन् पवारांच्या नेतृत्वावर स्तुतिसुमने उधळणाºया मेसेजचा पूर माध्यमांमध्ये आला होता. कोणत्याही क्षणी आदित्य ठाकरे बाहेर येतील अन् उद्या आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत, असे जाहीर करतील त्या क्षणाला अकोल्यात जल्लोषाचे फटाके, ढोल-ताशांचा गजर अन् गुलालांची उधळण करून महाशिवआघाडीच्या नव्या सत्तेच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. नेहरू पार्क परिसर, गांधी मार्गावर शिवसेनेच्या वतीने तर खुल्या नाट्यगृहासमोर राष्टÑवादी काँग्रसेने जल्लोषाची तयारी केली होती. फटाके आणून ठेवले, ढोल-ताशे बुक झाले, गुलालाची पोती आणली; पण आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पाहून सारेच थंडावले. जल्लोषात ‘आवाज कुणाचा?’ याला ‘महाशिवआघाडीचा’ हे उत्तरही तयार होते; मात्र सारेच थांबले. उद्या कदाचित सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तर पुन्हा नव्या जोमाने तयारी करावी लागेल या आशेने सारेच पदाधिकारी पुन्हा हिरमोड होऊन परतल्याचे चित्र अकोल्यात होते.तर सारेच नावापुरते आमदारराज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेस मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता राज्यपाल कोणती भूमिका घेतात, यावर आमदारांचे संवैधानिक भविष्य अवलंबून आहे. राज्यपालांनी कोणालाही सत्ता स्थापनेची संधी दिली नाही अन् जर राष्टÑपती राजवटीची शिफारस केलीच तर सर्व नवनिर्वाचित आमदार हे केवळ नावापुरते आमदार राहतील. त्यांना आमदार म्हणून कोणतेही अधिकार राहणार नाहीत, ते कोणतीही बैठक बोलावू शकणार नाहीत, ना कोणते निर्देश देऊ शकतील, त्यामुळे केवळ नवनिर्वाचित आमदार म्हणून कागदोपत्री मिरवणे एवढेच त्यांच्या हाती राहील.४अकोल्यातील पाचपैकी चार आमदार हे पुन्हा विजयी झाले आहेत, त्यामुळे त्यांना माजी आमदार म्हणून जे वेतन व भत्ते मिळतात ते कायम राहतील; मात्र बाळापूरचे आमदार म्हणून विजयी झालेल्या नितीन देशमुख यांना विधानसभा अस्तित्वात येऊन आमदार म्हणून शपथ घेतल्यावरच वेतन व भत्ते मिळू शकतील. राष्टÑपती राजवट लागलीच तर देशमुखांना ही संधीसुद्धा मिळणे कठीण होईल. त्यामुळे राज्यातील पेचप्रसंगाकडे सर्वांचचे लक्ष लागून आहे.

राष्टÑवादी काँग्रेसचे पदाधिकारी आशेवर !सोमवारी रात्री राष्टÑवादी काँग्रेसला राज्यपालांनी आमंत्रण दिल्यामुळे जल्लोष रद्द केलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा आशा निर्माण झाली आहे. पवार साहेब ‘गेम’ बसवतीलच ही आशा राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांना निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे पदाधिकारी सोमवारी रात्रीच्या या घडामोडीवर गॅसवर गेले आहेत. राजकारणाच्या या हाय होल्टेज ड्रामामुळे कार्यकर्त्यांचा जीव मात्र वर खाली होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना