जिल्ह्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST2021-06-27T04:13:51+5:302021-06-27T04:13:51+5:30

------------------- अकोट येथे छत्रपती शाहू महाराज जयंती अकोट : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक भाऊसाहेब पोटे विद्यालय ...

Celebration of the birth anniversary of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj in the district | जिल्ह्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

जिल्ह्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

-------------------

अकोट येथे छत्रपती शाहू महाराज जयंती

अकोट : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक भाऊसाहेब पोटे विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमामध्ये युवक काँग्रेस राज्य प्रवक्ता कपिल ढोके तथा शिवव्याख्याते प्रा. संतोष झामरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन बंडू पाटील कुलट यांच्या हस्ते करण्यात आले‌. त्यानंतर डॉ. सुहास कुलट, कुणाल कुलट, आर्किटेक्ट माधुरी पोटे, शिव गावंडे, प्राचार्य रावणकार यांनी पुष्पहार अर्पण केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य अतुल म्हैसने, प्राचार्य वाल्मीक भगत, प्रा. डी.आर. साबळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला अविनाश डिक्कर, प्रवीण भगत, मनाली गावंडे यांच्यासह भाऊसाहेब पोटे विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अनंत गावंडे यांनी तर आभार प्रा. अजय घनबहाद्दूर यांनी मानले.

Web Title: Celebration of the birth anniversary of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj in the district