राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने अमृतमहाेत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:24 IST2021-08-18T04:24:40+5:302021-08-18T04:24:40+5:30

शहीद जवान आनंद गवई यांचे वडील शत्रुघ्न गवई व मातोश्री तसेच शहीद जवान विजय खाडे यांच्या मातोश्री मनकर्णाबाई तायडे ...

Celebrating Amritmahatsavi Independence Day on behalf of NCP | राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने अमृतमहाेत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने अमृतमहाेत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा

शहीद जवान आनंद गवई यांचे वडील शत्रुघ्न गवई व मातोश्री तसेच शहीद जवान विजय खाडे यांच्या मातोश्री मनकर्णाबाई तायडे व शहीद जवान संजय खंडारे यांचे वडील सुरेश खंडारे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. डाॅ. श्रेयश अग्रवाल, मारवाडी युवा मंच, तिक्षनगत मल्टिपर्पज सोसायटी अध्यक्ष सुगत वाघमारे व चाईल्डलाईन टीम, ॲड. राजेश जाधव, सर्पमित्र बाळ काळणे, स्मशानभूमी कर्मचारी दीपक अरखराव, रुग्णसेवक सनी मृदुंगे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा, महानगर यांच्या नेतृत्वात व राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनात आनंद (पिंटू) वानखडे मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आला हाेता.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, संतोष कोरपे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगर अध्यक्ष विजय देशमुख, आमदार अमोल मिटकरी, तुकाराम बीडकर, हरिदास भदे, बळीराम सिरस्कार, श्रीकांत पिसे पाटील, श्यामबाबू अवस्थी, दिलीप आसरे, प्रा. सदाशिव शेळके, रफीक सिद्धिकी, जिल्ह्यातील व महानगरातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे सर्व फ्रंटलचे अध्यक्ष तथा पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद (पिंटू) वानखडे यांनी, तर सूत्रसंचालन अश्वजित सिरसाट यांनी केले. आभारप्रदर्शन अमित खांडेकर यांनी केले.

Web Title: Celebrating Amritmahatsavi Independence Day on behalf of NCP