कुरुम येथे महिला दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:21 IST2021-03-09T04:21:50+5:302021-03-09T04:21:50+5:30

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच अतुल वाट होते तर प्रमुख अतिथी, पो.पा.वसंत विरुळकर,अकोला जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष,भाजप बाबुभाऊ देशमुख, वैद्यकीय ...

Celebrate Women's Day at Kurum | कुरुम येथे महिला दिन साजरा

कुरुम येथे महिला दिन साजरा

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच अतुल वाट होते तर प्रमुख अतिथी, पो.पा.वसंत विरुळकर,अकोला जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष,भाजप बाबुभाऊ देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहलता अरबट, डॉ.अश्विनी आत्राम,प्रयोगशाळा तंत्रज्ञ डॉ.जे.आर.सोळंके उपस्थित होते.

यानिमित्त महिलांना स्त्री सक्षमीकरण व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या स्वाती गादे, आंचल बेलोकार व प्रशिदा खलोरकर, कोरोना योद्धा सुवर्णा देशमुख, स्काऊट गाईड, राज्य पुरस्कार गौरी देशमुख, साक्षी देशमुख, अनुष्का गादे, अंजली देशमुख, मंजिरी गुल्हाने आदींना गौरवपत्र देण्यात आले. याप्रसंगी ‘डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आशिष मेतकर, संस्थापक उपाध्यक्षा,वैष्णवी स.देशमुख, संस्थापक सदस्य रोशन श्रावण नागले व गौरी देशमुख, संस्थेचे संस्थापक सचिव प्रशांत आठोले, सहसचिव अतुल मामनकर, कोषाध्यक्ष करण कोडापे, संस्थापक सदस्य रवींद्र आठोले, रतिलाला अखंडे, गजा भुसुम उपस्थित होते.

Web Title: Celebrate Women's Day at Kurum