प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 19:41 IST2017-10-11T19:40:48+5:302017-10-11T19:41:11+5:30
अकोला : पर्यावरणाच्या हितासाठी व वाढते प्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पर्यावरणाच्या हितासाठी व वाढते प्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.
भारतीय सण आणि उत्सवांना एक वेगळा इतिहास आहे. सण साजरा करण्यामागे विशिष्ट उद्देश व हेतू असतो. दिवाळी तसा वसुबारस ते भाऊबीज, असा भरगच्च पाच दिवसांचा नात्यांची वीण घट्ट करणारा व ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, हा संदेश देणारा सण. काळोखाला दूर सारण्यासाठी दिवाळी सणात आकाश कंदील, पणत्या लावल्या जातात. त्यांचा प्रकाश मंद आणि आल्हाददायक वाटतो. याबरोबरीने फटाकेही मोठय़ा प्रमाणात फोडले जातात; परंतु फटक्याने होणार््या वायू आणि ध्वनिप्रदूषणामुळे बर्याच समस्या निर्माण होत आहेत. फटाक्यांच्या आवाजाने पक्षी घाबरतात, लहान मुले झोपेत दचकतात, मोठय़ा आवाजाने ध्वनी प्रदूषण होतेच, त्यामुळे तणाव आणि मानसिक विकार, या समस्यांना तोंड द्यावं लागते. या समस्यांव्यतिरिक्त प्रदूषणामुळे निसगार्ला हानी पोहचते, नागरिकांनी निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्यासाठी कुठेही पर्यावरणाचा र्हास होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. कमी आवाजाचे व कमी प्रदूषण निर्माण होणारेच फटाके फोडून दिवाळी आनंदात व उत्साहात साजरी करावी. कुठेही हवेचे, ध्वनीचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पाटील यांनी केले आहे.