प्लास्टिक निर्मूलन करून होळी साजरी करा
By Admin | Updated: March 5, 2015 01:55 IST2015-03-05T01:55:42+5:302015-03-05T01:55:42+5:30
आयुक्तांचे अकोलेकरांना आवाहन.

प्लास्टिक निर्मूलन करून होळी साजरी करा
अ ोला: प्लास्टिकच्या स्वैरवापरामुळे पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अकोला शहरात तर जागोजागी प्लास्टिक पडलेल्या असतात. त्यामुळे नाल्या तुंबण्याचे प्रकार घडत आहे. ते बघता होळी सणाच्या निमित्ताने अकोलेकरांनी प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करून पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याचे आवाहन मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांनी बुधवारी केले.शहरातील सर्व्हिस लाइन, नाल्या-गटारे घाणीने तुडुंब भरल्या आहेत. पाणी वाहून न जाता रस्त्यावर साचते. सार्वजनिक जागा, बाजार, मुख्य रस्त्यांसह प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा कचरा साचला असून, यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्यात आल्याचे आयुक्त सोमनाथ शेटे यांनी बुधवारी नमूद केले. नाल्यांमध्ये अडकून नाल्या तुंबल्याने घाण पाणी रस्त्याने वाहते. त्याचा त्रास नागरिकांनाच होता. ते बघता अकोला शहर सुंदर करण्यासाठी प्लास्टिक निर्मूलनाची नितांत गरज आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाच्या प्लास्टिक निर्मूलन मोहिमेला अकोलेकरांनी सहकार्य करण्याची अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.