मोर्णाकाठी पणती लावून दिवाळी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 16:01 IST2018-11-09T15:58:14+5:302018-11-09T16:01:08+5:30
अकोला: ‘एक पणती मोर्णाकाठी’ या उपक्रमांतर्गत बुधवारी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या कुटुंबासह काही नागरिकांनी मोर्णा नदीकाठी पणती लावून दिवाळी साजरी करण्यात आली.

मोर्णाकाठी पणती लावून दिवाळी साजरी
अकोला: ‘एक पणती मोर्णाकाठी’ या उपक्रमांतर्गत बुधवारी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या कुटुंबासह काही नागरिकांनी मोर्णा नदीकाठी पणती लावून दिवाळी साजरी करण्यात आली.
मोर्णा नदी स्वच्छता अभियानानंतर मोर्णा काठी घाट निर्मिती करण्यात आली असून, सौर दिवे लावण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रात लावण्यात आलेले करंजे शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळीच्या पर्वावर जिल्हा प्रशासनामार्फत दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘एक पणती मोर्णाकाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत बुधवारी सायंकाळी बाळापूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, त्यांच्या पत्नी नीता खडसे, मुलगी साना यांनी मोर्णाकाठी पणती लावून व पूजा करून दिवाळी साजरी केली. तसेच शहरातील काही नागरिकांनीदेखील मोर्णाकाठी दिवे लावून दिवाळी सण साजरा केला.