वृक्षारोपण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST2021-07-28T04:20:09+5:302021-07-28T04:20:09+5:30

यावेळी शिवसेना शहरप्रमुख विनायक गुल्हाने यांनी शहरात ‘एक हजार वृक्ष लागवड’ करण्याचा संकल्प केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ...

Celebrate Chief Minister Uddhav Thackeray's birthday by planting trees | वृक्षारोपण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

वृक्षारोपण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

यावेळी शिवसेना शहरप्रमुख विनायक गुल्हाने यांनी शहरात ‘एक हजार वृक्ष लागवड’ करण्याचा संकल्प केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी देवरण हिंदू स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता विविध प्रजातींची वृक्ष लागवड करून गोरगरिबांना भोजनाचे वितरण करण्यात आले. तसेच तालुक्यातील मौजे कंझरा, धानोरा पाटेकर, निंबा, धोत्रा आदी भागातील रोडवरील खड्डे बुजविण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक विनायक गुल्हाने, तालुका प्रमुख संगीत कांबे, जगदेव छबीले, सांगोले, नगरसेवक आशीष बरे, तसलीम खाॅं बिस्मिल्ला खाँ, डाॅ. नवघरे, सुबोध बंग, मुन्ना नाईकनवरे, बालू टांक, नंदकिशोर बबानिया, राहुल गुल्हाने, आशीष गुल्हाने, सविनय गुल्हाने, धीरज मोकाशे, जय ग्याने, बंडू पाटील लांडे, भोपळे, शाहरुख खान, रोहित गुल्हाने, संजय गुल्हाने, धम्दीप, सविनय गुल्हाने, विलास गुल्हाने आदी उपस्थित होते. (वा.प्र.) ८ बाय १०

Web Title: Celebrate Chief Minister Uddhav Thackeray's birthday by planting trees