आलिशान कारमधून गुरांची तस्करी करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश

By सचिन राऊत | Updated: October 13, 2023 16:28 IST2023-10-13T16:27:48+5:302023-10-13T16:28:51+5:30

टाेळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Cattle smuggling ring busted in luxury cars in akola | आलिशान कारमधून गुरांची तस्करी करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश

आलिशान कारमधून गुरांची तस्करी करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश

अकाेला : जिल्हयातील विविध पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून गुरांची आलीशान कारमधून तस्करी करणाऱ्या माेठया टाेळीला अटक करण्यात स्थानीक गुन्हे शाखेला शुक्रवारी यश आले. या टाेळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आकाेट फैलातील साेळाशे प्लाॅट येथील रहीवासी शेख अदनान शेख युसुफ कूरेशी याच्या मालकीच्या एम एच ०४ जीडी ०१२६ या झायलाे वाहनातून त्याचे साथीदार माेहम्मद राेशन शेख मुसा रा. मच्छी मार्केट, युसुफ खान रहीम खान रा. पुरपिडीत काॅलनी आकाेट फैल, माे. अबुजर माे. हनीफ कुरेशी रा. माेहम्मद अली राेड व शेख रेहान शेख रशीद रा. पिंजारी गल्ली या पाच जणांनी जिल्हयाच्या विविध ठिकाणावरून झायलाे व इनाेव्हा या दाेन कारमधून गुरांच्या तस्करीचा माेठा धंदा सुरु केला हाेता. या टाेळीने मुर्तीजापूर, आकाेट, उरळ, सिव्हील लाइन्स, आकाेट फैल, डाबकी राेड व एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून गुरांची तस्करी केल्याचे पाेलिस तपासात समाेर आले आहे.

या चाेरटयांना पुढील तपासासाठी सिव्हील लाइन्स पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाइ पाेलिस अधीक्षक संदिप घुगे, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे, स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास भगत, पीएसआय गाेपाल जाधव, गणेश पांडे, राजपालिसंह ठाकूर, दशरथ बाेरकर, प्रमाेद ढाेरे, भास्कर धाेत्रे, सुलतान पठान, रवि खंडारे, महेंद्र मलीये, अविनाश पाचपाेर, विशाल माेरे, अमाेल दिपके,राहूल गायकवाड, सुमीत राठाेड, स्वप्नील चाैधरी, प्रशांत कमलाकर, माे. नफीस यांनी केली.

हा मुद्देमाल केला जप्त
एक आलीशान झायलाे, दाेन महागडया दुचाक्या, दाेन महागडे माेबाइल असा एकून १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर इनाेव्हा गाडी लपविण्यात आली असून या गाडीचा पाेलिस शाेध घेत आहेत.

Web Title: Cattle smuggling ring busted in luxury cars in akola

टॅग्स :Akolaअकोला