शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात जनावरांना मिळेना भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 12:50 IST

अकोला : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चाराटंचाईच्या स्थितीत जनावरे विकण्याशिवाय शेतकºयांसमोर पर्याय उरला नाही; मात्र बाजारातही जनावरांना भाव मिळत नसल्याने, कमी दरात जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

- संतोष येलकरअकोला : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चाराटंचाईच्या स्थितीत जनावरे विकण्याशिवाय शेतकºयांसमोर पर्याय उरला नाही; मात्र बाजारातही जनावरांना भाव मिळत नसल्याने, कमी दरात जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील सर्व गावांसह अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार महसूल मंडळातील गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. नापिकीच्या स्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. नापिकीच्या स्थितीत चाºयाच्या उत्पादनातही घट झाली आहे. येत्या काही दिवसांत पाणी आणि चाराटंचाईची परिस्थिती आणखी तीव्र होणार असल्याने, जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे; मात्र बाजारातही भाव मिळत नसल्याने मिळणाºया कमी दरात शेतकºयांना जनावरे विकावी लागत आहेत.बाजारात जनावरांनाअसा मिळत आहे भाव!एक लाख रुपये किमतीच्या बैलजोडीला बाजारात ६० ते ६५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. ५५ हजार रुपये कि मतीच्या म्हशीला ३५ ते ४० हजार रुपये, ६ ते ७ हजार रुपये किमतीच्या शेळीला ३ ते ४ हजार रुपयांचा भाव मिळत असून, दुभत्या गायी-म्हशी आणि वहितीकरिता तयार होणाºया गुरांनाही बाजारात कमी भाव मिळत असल्याचे वास्तव आहे.पाणी-चारा कोठून आणणार?टंचाईच्या परिस्थितीत जिथे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे, तेथे जनावरांना जगविण्यासाठी पिण्याचे पाणी आणि चारा कोठून आणणार, याबाबतची चिंता पशुपालक शेतकºयांना सतावत आहे. त्यामुळे मिळणाºया कमी भावात जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.कडबा पेंढीचे भाव शेकडा पाच हजार रुपये!दुष्काळी परिस्थितीत चाºयाच्या उत्पादनात घट झाल्याने, चाºयाचे भाव वधारले आहेत. त्यामध्ये सध्या कडबा पेंढीचे भाव शेकडा पाच हजार रुपये असून, २० किलो कडबा कुट्टी पोत्याचे भाव ३४० रुपये आहेत. 

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पाणी आणि चाराटंचाईच्या परिस्थितीत जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे; परंतु जनावरांना कमी भाव मिळत असून, मिळेल त्या भावात शेतकºयांना जनावरे विकावी लागत आहेत.-शिवाजी भरणे,शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेतीdroughtदुष्काळ