लाखपुरी परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST2021-01-20T04:20:11+5:302021-01-20T04:20:11+5:30

मूर्तिजापूर: तालुक्यातील लाखपुरी परिसरात गुरांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील पशुपालक, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले ...

Cattle gang active in Lakhpuri area | लाखपुरी परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय

लाखपुरी परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय

मूर्तिजापूर: तालुक्यातील लाखपुरी परिसरात गुरांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील पशुपालक, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तत्काळ या टोळीला अटक करा, अशी मागणी जि.प. सदस्य अप्पू तिडके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

तालुक्यातील लाखपुरी परिसरातून अनेक गुरे चोरी गेल्याने शेतकऱ्यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील लाखपुरी, भटोरी या ग्रामीण भागातील अनेक परिसरातील गत १० महिन्यांपासून गुरे चोरी जाण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे; परंतु या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. गुरे चोरणाऱ्या टोळीचा तपास अद्यापही लागला नसल्याने शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे तत्काळ गुरे चोरणा-या टोळीला अटक करून कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनातून केली आहे.

Web Title: Cattle gang active in Lakhpuri area