रस्त्यावर पडलेला मांजा ठरतोय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:18 AM2021-01-22T04:18:13+5:302021-01-22T04:18:13+5:30

मोकाट कुत्र्यांचा हैदोस अकोला : वाशिम बायपास परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या भागात उघड्यावर मांस विक्री होते. ...

A cat lying on the road is becoming dangerous | रस्त्यावर पडलेला मांजा ठरतोय घातक

रस्त्यावर पडलेला मांजा ठरतोय घातक

Next

मोकाट कुत्र्यांचा हैदोस

अकोला : वाशिम बायपास परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या भागात उघड्यावर मांस विक्री होते. त्यामुळे या भागात मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त आहे. येथून जाणाऱ्या वाहनांच्या मागे कुत्रे लागत असल्याचे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. महापालिकेचा कोंडवाडा विभाग अकार्यक्षम असल्याने गत अनेक दिवसांपासून शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूचे सेवन

अकोला : तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामाध्यमातून शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, अद्यापही या समितीमार्फत कारवाई केली जात नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये अनेक जण सर्रास तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना दिसून येते.

Web Title: A cat lying on the road is becoming dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.