एरंडा ग्रामपंचायत अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:14 IST2021-01-10T04:14:17+5:302021-01-10T04:14:17+5:30

बार्शीटाकळी : कान्हेरी सरप जिल्हा परिषद सर्कलमधील ग्राम एरंडा या गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतमधील नऊ ...

Castor Gram Panchayat Conflict | एरंडा ग्रामपंचायत अविरोध

एरंडा ग्रामपंचायत अविरोध

बार्शीटाकळी : कान्हेरी सरप जिल्हा परिषद सर्कलमधील ग्राम एरंडा या गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतमधील नऊ सदस्य अविरोध निवड निश्चित करून पूर्ण तालुक्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गावातील राजकारण ग्राम विकासाच्या मधात न येऊ देत सर्वांनी सहकार्य करून एक नवीन पायंडा घालून दिला. यावेळी नवनिर्वाचित अविरोध सदस्यांचा सत्कार शिवसेना जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर यांनी केला. यावेळी पवन ओमप्रकाश शर्मा, अश्विनी शंकर ढवळे, सीमा बंडू बघे, साहेबराव बनसोड, अलका सुनील भोंगरे, रीता निकोसे, शिल्पा विलास फाटकर, सुरेश शिंदे, मोहिनी गणेश वैराळे हे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व सुरेश पाटील, दिगंबर भोंगरे, गौतम निकोसे, गजानन तायडे, राजू गवळी, अंबादास पुरी, शंकर पाटील, रमेश वाकोडे ग्रामस्थ बंडू शिंदे, देवेंद्र लासुरकर, राम टापरे, विजू आगरकर, तुळशीराम लोथे, निवृत्ती दाते आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Castor Gram Panchayat Conflict