गोवंश डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 20, 2015 01:45 IST2015-04-20T01:45:53+5:302015-04-20T01:45:53+5:30
ताजनापेठ परिसरात ४२ बैल कत्तलीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

गोवंश डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
अकोला: ताजनापेठ परिसरात ४२ बैल कत्तलीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी रविवारी सकाळी रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यानंतरही शहरामध्ये चोरट्या मार्गाने वाहतूक करून गोवंश कत्तलीसाठी नेल्या जात आहे. शनिवारी रात्री साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व त्यांच्या अँन्टी गुंडा स्क्वॉडमधील कर्मचार्यांना ताजनापेठेतील काझीपुरा परिसरामध्ये ४२ बैलांना कत्तलीसाठी डांबून ठेवल्याची माहिती मिळाली. यावरून डॉ. मुंढे व पोलीस कर्मचार्यांनी ताजनापेठ परिसरात छापा घालून बैलांची सुटका केली आणि सर्व बैलांची आकोट फैलातील महापालिकेच्या कोंडवाड्यात रवानगी केली. कारवाईदरम्यान आरोपी फरार झाले. पोलीस कर्मचारी दीपक तोंडके यांच्या तक्रारीनुसार, रविवारी सकाळी रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध ५ ब महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ व ११ ल महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ नुसार गुन्हा दाखल केला.