मांसाची वाहतूक करणारा ट्रक उलटला

By Admin | Updated: October 1, 2014 01:17 IST2014-10-01T01:17:26+5:302014-10-01T01:17:26+5:30

कुरणखेडनजीकची घटना

The cargo trucks overturned | मांसाची वाहतूक करणारा ट्रक उलटला

मांसाची वाहतूक करणारा ट्रक उलटला

बोरगाव मंजू (अकोला): मोठय़ा प्रमाणात जनावरांच्या मांसाची वाहतूक करीत असलेला एक ट्रक राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर कुरणखेड नवीन वस्ती बस थांब्यानजीक उलटल्याची घटना मंगळवार, २५ सप्टेंबर रोजी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास घडली. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
प्राप्त माहितीनुसार, मूर्तिजापूरहून अकोल्याच्या दिशेने जात असलेल्या यूपी ९२ टी १२१७ क्रमांकाच्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. सदर ट्रकमध्ये जनावरांच्या मांसाची वाहतूक केली जात होती. अपघाताची माहिती मिळताच मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नंदकुमार काळे व बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे ठाणेदार डी. के. आव्हाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गत महिन्यात दाळंबी-कोळंबीच्या महिला शेजमजुरांना चिरडणारा ट्रक संतप्त जमावाने याच ठिकाणी पेटवून दिला होता.
नवरात्रोत्सव काळात मांसाची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने लोकांचा भावनोद्रेक होऊ नये यासाठी एसडीपीओ काळे यांनी अकोला येथून अतिरिक्त पोलिस कुमक बोलावून घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ट्रकचालकासह चौघांना ताब्यात घेतले आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.

Web Title: The cargo trucks overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.