मालगाडीतील कोळशाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:24 IST2017-10-25T01:24:12+5:302017-10-25T01:24:48+5:30
अकोला : नागपूरवरून कोळसा घेऊन येणार्या मालगाडीच्या ३३ नंबरच्या डब्याला बोरगाव मंजूजवळ मंगळवारी पहाटे आग लागली. नागपूरहून भुसावळकडे मालगाडी जात होती.

मालगाडीतील कोळशाला आग
ठळक मुद्देनागपूरवरून कोळसा घेऊन येणार्या मालगाडी३३ नंबरच्या डब्याला बोरगाव मंजूजवळ मंगळवारी पहाटे आग लागली
अकोला : नागपूरवरून कोळसा घेऊन येणार्या मालगाडीच्या ३३ नंबरच्या डब्याला बोरगाव मंजूजवळ मंगळवारी पहाटे आग लागली. नागपूरहून भुसावळकडे मालगाडी जात होती. बोरगाव मंजूजवळ या गाडीचे गार्ड एस. के. गुप्ता यांना डब्यातील कोळशामधून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती मालगाडीचे चालक आणि अकोला रेल्वेस्थानक प्रबंधकांना दिली. त्यानंतर आगीची माहिती अकोला मनपा अग्निशमन दलास दिली. अग्निशमन दलाने तातडीने रेल्वे स्टेशन गाठले. आग विझविण्याआधी टीआरडीचे सुभाष यांनी विद्युत प्रवाह बंद केला. त्यानंतर अग्निशमनच्या जवानांनी आग विझविली.