कारला अज्ञात वाहनाची धडक
By Admin | Updated: February 22, 2017 02:38 IST2017-02-22T02:38:12+5:302017-02-22T02:38:12+5:30
अपघातात चालक गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू.

कारला अज्ञात वाहनाची धडक
अकोला, दि. २१- अकोल्यावरून अंदुरा येथे आपल्या गावी जात असलेल्या पत्रकार संदीप पांडव यांच्या कारला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री अंदुरानजीक घडली. या अपघातात पांडव गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संदीप पांडव हे अंदुरा येथे त्यांच्या गावी परत जात होते. यावेळी त्यांच्या एम एच १५ - २५१ क्रमांकाच्या कारला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात संदीप पांडव गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात त्यांच्या कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. समोरून आलेले वाहन हे ट्रक असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.