महामार्गावर कार-ट्रक अपघात; तीन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 20:30 IST2017-08-02T20:29:57+5:302017-08-02T20:30:58+5:30
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूनजीक कार व ट्रक अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी घडली.

महामार्गावर कार-ट्रक अपघात; तीन जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूनजीक कार व ट्रक अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी घडली.
मूर्तिजापूरकडून अकोलाकडे जाणारा एमएच ३0 एबी २१९३ क्रमांकाचा ट्रक व अकोलाकडून मूर्तिजापूरकडे जाणारी एमएच २८ व्ही ७६७३ क्रमांकाच्या कारची येथील साबन फॅक्टरीसमोर वळणावर समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारचे नुकसान होऊन तीन जण जखमी झाले. अपघातातील जखमींना उपचारार्थ अकोला येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती असून, वृत्त लिहि पर्यंत पोलीस दप्तरी अपघाताची नोंद झाली नव्हती. दरम्यान, सदर घटनास्थळावर वळण असून, येथे साबन खरेदीकरिता वाहने थांबतात. त्यामुळे या आधीसुद्धा याच ठिकाणावर अपघात झाले. संबंधित विभागाने या बाबीची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.