अकोट-शेगाव मार्गावर कार-ट्रॅक्टरची धडक; अमरावती येथील एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 11:07 AM2021-01-23T11:07:37+5:302021-01-23T11:08:38+5:30

Accident on Akot - Shegon Road प्रकाश जांभे (३५) (रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) असे मृताचे नाव आहे.

Car-tractor hit on Akot-Shegaon road; One killed of Amravati | अकोट-शेगाव मार्गावर कार-ट्रॅक्टरची धडक; अमरावती येथील एक जण ठार

अकोट-शेगाव मार्गावर कार-ट्रॅक्टरची धडक; अमरावती येथील एक जण ठार

Next
ठळक मुद्देट्रॅक्टर क्र. (एमएच ३० बीबी १६३६) यास मागून धडक दिली. घटना २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

तेल्हारा (जि. अकाेला) : तालुक्यातील देवरी-अडसूळ रस्त्यावर उमरीनजीक ट्रॅक्टर व कारची धडक होऊन एक जण ठार झाल्याची घटना शुक्रवार, २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. प्रकाश जांभे (३५) (रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) असे मृताचे नाव आहे.

तेल्हारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरी-अडसूळ मार्गाने अमरावती येथील कौस्तुभ सुभाष शिंगणे (२५) व प्रकाश जांभे (३५) हे दोघे कार क्रमांक (एमएच २७, बीई ५८१) ने शेगावकडे जात असताना मार्गावरील उमरीनजीक मातीने भरलेला ट्रॅक्टर क्र. (एमएच ३० बीबी १६३६) यास मागून धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली होती. या अपघातात वाहनात बाजूला बसलेला प्रकाश जांभे (३५) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.  

Web Title: Car-tractor hit on Akot-Shegaon road; One killed of Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.