शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कार खरेदी फसवणूक प्रकरण : राष्ट्रवादीच्या नेत्या आशा मिरगे व  मुलाचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 12:37 IST

न्यायालयाने मिरगे माता-पुत्रचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

अकोला : पारसकर ह्युंडाई शोरुम येथून कार खरेदी केल्यानंतर ओळखीचा फायदा घेत पोस्ट डेटेड चेक (पीडीसी) देण्याचे आमीष देऊन ते चेक न देता शोरुम मालकाची सुमारे ४ लाख ९३ हजार ८९९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. आशा मिरगे व त्यांचा पुत्र अनिमेष मिरगे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल होताच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली; मात्र न्यायालयाने मिरगे माता मुलाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तसेच महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशा मिरगे व त्यांचा पुत्र अनिमेष मिरगे या दोघांनी अनिमेषच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने सहा लाख ६८ हजार रुपयांची आसेंट कार ३० सप्टेंबर २०१९ रोजी पारसकर ह्युंडाई येथून खरेदी केली होती, तसेच २६ हजार रुपयांच्या अ­ॅसेसरीज लावल्या. विवेक पारसकर यांच्याशी ओळखी असल्याने मिरगे यांनी कर्ज होत नसल्याचे कारण सांगून १०१ रुपया सुरुवातीला दिला, तसेच उर्वरित रक्कम ९ धनादेशाद्वारे देण्याचे आमीष दिले. मुलगा पुण्याला राहत असल्याने कार पुण्याला नेणार असल्याचे सांगत कारची पासिंगही तातडीने करून घेतली; मात्र पारसकर यांनी पैसे मागितले असता, आशा मिरगे यांनी सुरुवातीला एक लाख रुपयांचा धनादेश २ मार्च रोजी म्हणजेच कार खरेदी केल्यानंतर सहा महिन्यांनी दिला; मात्र त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे विवेक पारसकर यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आशा मिरगे व त्यांचा पुत्र अनिमेष मिरगे या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४०६ नुसार गुन्हा दाखल करताच आशा मिरगे आणि त्यांच्या मुलाने अटकपूर्व जामीन घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आशा मिरगे आणि त्यांच्या मुलगा अनिमेश मिरगे या दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे मिरगे व त्यांच्या मुलाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेस