कारची दुचाकीस धडक, तीन जखमी

By Admin | Updated: April 21, 2017 01:46 IST2017-04-21T01:46:58+5:302017-04-21T01:46:58+5:30

कापशी : भरधाव इंडिका कारने दुचाकीस धडक दिल्याने तिघे जखमी झाल्याची घटना अकोला पातूर रस्त्यावर कापशी फाटा येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली.

The car hit two-wheelers, three injured | कारची दुचाकीस धडक, तीन जखमी

कारची दुचाकीस धडक, तीन जखमी

कापशी : भरधाव इंडिका कारने दुचाकीस धडक दिल्याने तिघे जखमी झाल्याची घटना अकोला पातूर रस्त्यावर कापशी फाटा येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली.
राजंदा येथील बाळाभाऊ जंजाळ (५०), विजू चव्हाण व मनीष ठाकरे रा. अकोला हे दुचाकी क्र. एमएच ३० यू २७ अकोल्यावरून राजंदा येथे जात होते.
दरम्यान, कापशी फाट्यावर समोरून येत असलेल्या इंडिका कारने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये तिघेही जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना तातडीने अकोला येथे पाठविले. 

Web Title: The car hit two-wheelers, three injured